
भंडाऱ्यात प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची कार्यकर्ता बैठक संपन्न….
बैठकीदरम्यान अनेकांनी घेतला राष्ट्रवादीत पक्षप्रवेश…..पक्षप्रवेशाने आगामी निवडणुकांमध्ये समीकरणात बदलणार….. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठक भंडाऱ्यातील हॉटेल व्ही.के. येथे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये